BEED24

बीड जिल्ह्यात आज 1237; धारुर 72, केज 129…. पहा तालुकानिहाय परिस्थिती.

बीड दि.25 एप्रिल- बीड (Beed) जिल्ह्यातील 4779 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1237 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3542 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी आज रात्री पासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

(1237 today in Beed district; Dharur 72, Cage 129 …. See Taluka wise situation.)

आज चाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 232 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 225, आष्टी तालुक्यात 130 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 72 तर केजमध्ये 129 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-232, अंबाजोगाई-225, आष्टी-130, धारुर-72, गेवराई-117, केज-129, माजलगाव-62, परळी-74, पाटोदा-68, शिरुर-69, वडवणी-59 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) चा उद्रेक जिल्ह्यातच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात वाढलेला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजारावर येत आहे. राज्य सरकारने बुधवारी रात्री पासून नवीन निर्बंध जाहिर केले असून 1 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) 24 तासांत 676 जणांचा मृत्यू तर राज्यात एकूण 67,160 रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर तब्बल 63,818 रुग्णांचा डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रुग्णांसह राज्यातील सध्याची सक्रिय रुग्णसंख्या 6,94,480 एवढी झाली आहे. तर आजच्या 676 मृत्यूंमुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा 63,928 वर गेला आहे.

Exit mobile version