BEED24

मुंबई : ‘नीट’ (NEET) आणि ‘जेईई-मेन्स’ (JEE-Mains) परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘जेईई-मेन्स’ परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान घेतली जाणार असून वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा 26 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने वेळापत्रकाची घोषणा केली. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज ही घोषणा केली.  ‘कोरोना’च्या संकटकाळात देशभरातील सर्वच परीक्षा पुढे ढकलल्यामुळे वैद्यकीय प्रवेश इच्छुक उमेदवारांवर अनिश्चिततेच वातावरण  होतं.

देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (एनईईटी) अर्थात ‘नीट’ परीक्षा रविवार दि. २६ जुलै रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यापूर्वी ५, ७, ८ आणि ११ एप्रिलला नियोजित असलेली ‘जेईई मेन्स’ २०२० परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता याही तारखा बदलल्या आहेत. ‘जेईई-मेन्स’ आता १८, २०, २१, २२ आणि  २३ जुलै या दिवशी होईल. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित नाही.

Exit mobile version