BEED24

वस्तीगृहातील 152 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा; आश्रमशाळेतही आढळली 37 बाधित

लातूर/पालघर दि.12 मार्च – लातूर मधील एका वस्तीगृहातील पुन्हा 41 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले आहेत. आजपर्यंत या वस्तीगृहातील 152 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. या वस्तीगृहात (hostel) यापुर्वीही अशीच संख्या पॉझिटीव्ह आढळली होती. तर पालघर (Palghar) जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातही एका आश्रमशाळेत 37 जण बाधित आढळली आहेत.

(152 students in the hostel were hit by a corona; 37 affected were also found in the ashram school)

लातूर पॅटर्न मुळे राज्यात वेगळी शैक्षणिक ओळख मिळवलेल्या लातूर मध्ये वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. कोरोनामुळे लातूर सोडण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली होती. शासनाने लावलेल्या लॉकडाऊन नंतर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती, जिल्ह्यातील सर्व वस्तीगृहे (hostel) सुद्धा बंद होती. हळूहळू सर्व सुरू होत असताना आता पुन्हा कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा वाढत असल्याने पुन्हा निर्बंध वाढवण्यात आली आहेत. एमआयडीसी (Latur MIDC) मधील वस्तीगृहातील आज 41 विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. आजपर्यंत या वसतीगृहातील तब्बल 152 जण कोरोना बाधित (Corona Positive) आढळून आले आहेत. कोरोना बाधित आढळून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असली तरी एमआयडीसी (Latur MIDC) मधील या वस्तीगृहात बाधित आढळण्याची शृंखला सुरुच आहे.

पालघरमध्ये (Palghar) आश्रमशाळेतील 37 मुले पॉझिटीव्ह
जव्हार तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. एका आश्रमशाळेतील 37 मुले तर त्याच शाळेतील 3 शिक्षक आणि आदिवासी विकास विभागाचे विनवळ येथील सेंट्रल किचनचे 16 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळेले आहेत. काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाचे विनवळ आश्रमशाळेतील श्रीशक्ती संस्थेचे सेंट्रल किचन येथील 16 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या रुग्णांना किरकोळ लक्षणे असून यातील काहींना विक्रमगड येथील रिव्हेरा या कोविड केंद्रात हलविण्यात आले आहे.

Exit mobile version