BEED24

नगर परिषद कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

किल्लेधारूर दि.३१(वार्ताहर)  आज नगर परिषद कार्यालयात राजमाता पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमीत्त प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी नविन धुरळणी यंत्राचा शुभारंभ करण्यात आला.  शहरामध्ये ३ धूरळणी यंत्राच्या साहाय्याने धूरळणी करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी यांनी यावेळी  सांगीतले. यावेळी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी  भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. स्वरुपसिंह हजारी, मूख्याधिकारी सुहास हजारे, बाळासाहेब गायकवाड, संतोष बप्पा सिरसट उपस्थित होते.

Exit mobile version