BEED24

एकाच शाळेतील २० शिक्षक पॉझिटीव्ह… धारुरचे ७७ शिक्षकांसह ८६ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा

किल्लेधारूर दि.२१(वार्ताहर) शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना कोरोना corona चाचणी बंधनकारक केल्यानंतर काल उस्मानाबाद मधील एका शाळेतील २० शिक्षक Teacher कोरोना Corona पॉझिटीव्ह Positive आढळल्याने शिक्षकात खळबळ उडाली. येथील कोविड (Covid-19) केअर सेंटरमध्ये काल दि.२० शुक्रवार रोजी ७७ माध्यमिक शिक्षक तर ९ संशयित रुग्णांची असे ८६ स्वॅब (swab) नमुने अंबाजोगाई (Ambajogai) येथील प्रयोग शाळेत School पाठवण्यात आली असुन त्यांचा अहवाल आज प्राप्त होणार आहे. काल ४३ शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आली.

सोमवार पासुन नववी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षकांची कोविड-१९ (covid-19) चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. काल उस्मानाबाद मधील श्रीपतराय भोसले हायस्कुल मधील २० शिक्षक Teacher कोरोना corona पॉझिटीव्ह Positive आढळून आल्याने शिक्षक वर्गात खळबळ माजली. धारुर तालुक्यात एकुण २६ माध्यमिक शाळा School तर ४ उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. यातील २२० शिक्षकांच्या कोविड-१९ (covid-19) तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. यातील जवळपास ९५ शिक्षकांची तपासणी निगेटिव्ह आली आहे. काल दि.२० रोजी येथील कोविड सेंटरमध्ये तब्बल ७७ शिक्षकांची स्वॅब घेण्यात आली. तर कोविड सेंटरवर १२ ॲन्टीजन (Antigen) चाचणी करण्यात आली होती. आज संध्याकाळ पर्यंत ७७ शिक्षकांसह ९ संशयित रुग्ण अशा ८६ जनांचे स्वॅब (Swab) अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

Exit mobile version