बीड दि.25 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हयातील सन 2021 मध्ये वेगवेगळया पोलीस स्टेशन (Police station) हद्दीमध्ये शरीराविरुध्द, माला विरुध्दचे गुन्हे करणारे टोळया मधील इसमाविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 अन्वये हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या अधिकारामध्ये सदर प्रकरणात सुणावनी घेऊन इसमांची टोळी ही गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याने, त्यांची गावात, तालुक्यात दहशत असल्यामुळे व त्यांच्या गैरकृत्यामुळे कायदा व सुव्यस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी गेल्या आठवडयामध्ये वेगवेगळया तालुक्यातुन 22 इसमांना हद्दपार केले आहे.
(22 deported, including three from Dharur; Action of Superintendent of Police.)
हद्दपार करण्यात आलेले इसम व पोलिस ठाणे
1.पोलीस ठाणे धारुर
धारुर (Dharur) पोलिस ठाणे हद्दीतील इसम 1.भास्कर ज्ञानोबा कुँदे 2. विलास ज्ञानोबा कुँदे 3. श्रीकांत प्रभाकर कुंदे सर्व रा. उमराई ता.अंबाजोगाई यांना धारुर, केज, वडवणी, अंबाजोगाई, या तालुक्यातुन हद्दपार (deported) केले आहे.
2. पोलीस ठाणे अंमळनेर
अंमळनेर पोलिस ठाणे हद्दीतील इसम नामे 1.आबा मल्हारी सुळ 2.दादासाहेब आबा सुळ 3.बालासाहेब बबन सुळ सर्व रा. खोपटी ता. शिरुर यांना शिरुर, आष्टी, पाटोदा या तालुक्यातुन हद्दपार केले आहे. तसेच इसम नामे 1.संतोष गोरख खोटे 2.संजय गोरख खोटे 3.गोरख त्रींबक खोटे सर्व रा. मुगगाव ता.पाटोदा, व इसम नामे 1.ज्ञानदेव साहेबराव खोटे 2.बापुराव साहेबराव खोटे 3.सुधाकर साहेबराव खोटे 4.युवराज ज्ञानदेव खोटे सर्व रा. मुगगाव ता. पाटोदा यांना पाटोदा, आष्टी, शिरुर तालुक्यातुन हद्दपार केले आहे.
3. पोलीस ठाणे चकलांबा
चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत राहाणारे 1.जालींदर सर्जेराव येवले 2.विशाल जालींदर येवले दोन्ही रा.पाथरवाला खु. ता गेवराई यांना गेवराई तालुक्यातुन हद्दपार केले आहे.
4.पोलीस ठाणे बर्दापुर
बर्दापुर पोलिस ठाणे हद्दीतील इमस नामे 1. सिध्देश्वर बालाजी दराडे 2.महादेव बालाजी दराडे दोन्ही रा. दरडवाडी ता. अंबाजोगाई यांना अंबाजोगाई तालुक्यातुन हद्दपार केले आहे.
5. पोलीस ठाणे पिंपळनेर
पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीतील इसम नामे 1.हरिदास मनोहर जगताप 2.प्रताप हरिदास जगताप 3. अमोल हरिदास जगताप सर्व रा. भवानवाडी ता. बीड यांना बीड व वडवणी तालुक्यातुन हद्दपार केले आहे.
6.पोलीस ठाणे गेवराई
गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील इसम नामे 1.संतोष हनुमान धनगर रा. गोपाळवस्ती बेलगाव ता. गेवराई 2.भागवत सखाराम पवार रा. नागझरी ता. गेवराई यांना हद्दपार केले आहे.
सदर 22 इसमांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक बीड आर.राजा यांनी वेगवेगळया तालुक्यातुन हद्दपार केले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) विलास हजारे यांनी प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे पोलिस अधिक्षक (Superintendent of Police) आर. राजा यांचे कौतूक होत आहे.