BEED24

आज ५१ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा; जिल्ह्यात ५८ बळी

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) काल ५१ लोकांचे थ्रोट स्वॅब येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत पाठवण्यात आली असुन आज रात्री त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. सध्या जिल्ह्यात आतापर्यंत २२५२ रुग्णांची नोंद झाली आहे. यातून ८८५ कोरोनामुक्त झाली तर १३०९ जन उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्याही ५८ झाली आहे.

शहरात गेल्या तेरा दिवसांपासून दररोज पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहेत. काल येथील कोविड केअर सेंटरमधून अंबाजोगाई प्रयोगशाळेत ५१ लोकांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचे अहवाल आज रात्री प्राप्त होणार आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे उग्र रुप दिसुन येत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २२५२ रुग्णांची नोंद झाली आहे. यातून ८८५ कोरोनामुक्त झाली तर १३०९ जन उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्याही ५८ झाली आहे.

Exit mobile version