बीड दि.17 मार्च- आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2363 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 266 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2097 जण निगेटिव्ह आली आहेत. आज चौदाव्या दिवशी बीड तालुक्यात 100 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. बीड पाठोपाठ आज अंबाजोगाईत 60 रुग्ण आढळून आली आहेत. आज धारुरमध्ये 4 कोरोना बाधित आढळली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
(266 patients in Beed district today; Beed 100 and Ambajogai 60 … see taluka wise statistics)
1. बीड- 100 7.माजलगाव-35
2. अंबाजोगाई-60 8.परळी-15
3. आष्टी-9 9.पाटोदा-9
4. धारुर-4 10.शिरुर-4
5. गेवराई- 18 11.वडवणी-4
6. केज-8
वरील प्रमाणे कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.17 बुधवार रोजी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 266 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या आठवड्यापासून झपाट्याने वाढत आहे.