बीड दि.19 मार्च- दोन आठवड्यापासून बीड जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या प्रशासनाची झोप उडवत आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1911 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 294 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 897 जण निगेटिव्ह आली आहेत. आज पंधराव्या दिवशी बीड तालुक्यात 117 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. बीड पाठोपाठ आज अंबाजोगाईत 58 रुग्ण आढळून आली आहेत. आज धारुरमध्ये 7 कोरोना बाधित आढळली आहेत.
(294 patients in Beed district today; Increase in Ambajogai Ashti … Cage 10 and 7 in Dharur … See Taluka wise statistics)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड- 117, अंबाजोगाई-58, आष्टी-33, धारुर-7, गेवराई- 14, केज-10, माजलगाव-26, परळी-22, पाटोदा-1, शिरुर-4, वडवणी-2
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.19 शुक्रवारी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 294 वर पोहोचली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या दोन आठवड्यापासून झपाट्याने वाढतच आहे.
दरम्यान, बुधवारी दिवसभरात 23 हजार 179 नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानंतर गुरुवारी राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सर्वाधिक 24 हजार 896 रुग्ण एक दिवसात आढळले होते. गुरुवारी 25 हजार 833 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आहेत. सध्या राज्यात 1 लाख 52 हजार 760 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची संख्येमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.