BEED24

बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेत 316 कोटीचा गैरव्यवहार; संचालक मंडळावर गुन्हा नोंद.

बीड दि.18 डिसेंबर – आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे बीड (Beed) येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक (Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank) अडचणीत सापडली आहे. या प्रकरणी बँकेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेसह (Reserve Bank) न्यायालयाने दिले आहेत. आज दि.18 शनिवारी सांयकाळी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

(316 crore fraud in Beed’s Dwarkadas Mantri Bank; Crime record on board of directors.)

सहकार आयुक्तांच्या आदेशावरून द्वारकादास मंत्री बँकेचे प्रशासक अशोक कदम हे बीड शहरातील शिवाजीनगर पोलिसात ठाण मांडून बसले होते. मात्र या प्रकरणात बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात होती. बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेत 316 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड झाल्यानंतर बीडमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँकेने द्वारका मंत्री बँकेवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते.

अखेर जिल्ह्याच्या सहकार, शिक्षण क्षेत्रात नाव असलेले सुभाष सारडा (Subhash Sarada) यांच्यासह द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळा विरुद्ध गुन्हा (Crime) नोंद झाला. सुभाष सारडा संस्थापक असलेल्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर यापूर्वीच प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे.

सुभाष सारडा अनेक वर्षे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेही (DCC Bank) अध्यक्ष होते. त्यांच्या अधिपत्याखाली द्वारकदास नागरी सहकारी बँकेतील कर्जवाटपातील अनियमिततेबाबत राज्याच्या सहकार खात्यापासून रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) पर्यंत तक्रारी होत्या. लेखा परीक्षणात कर्ज वितरणातील अनियमितांवर ठपका ठेवत काही महिन्यांपूर्वी या बँकेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती.

यासंदर्भात उच्च न्यायालयानेच थेट पोलीस अधीक्षकांना (Superintendent of Police) शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर या साऱ्या प्रक्रियेला शुक्रवार पासून वेग आला. मात्र, स्थानिक राजकारण, सहकार विभागातील अधिकाऱ्यांवर असलेल्या दबावामुळे पोलिसांकडून प्रक्रीयेला विलंब लागला. अखेर शनिवारी सायंकाळी गुन्हा नोंद झाला.

काही कर्ज वाटपामध्ये बँकेच्या सहसंचालक मंडळाने नियमांचे पालन न केल्याचा ठपका आहे. मात्र मागच्या काही काळात ही प्रक्रिया थंडावली होती. त्यानंतर सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेले. यावर उच्च न्यायालयाने थेट बीडच्या पोलीस अधीक्षकांनाच शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

याप्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Police station) बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यासह 23 संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चार व्यवस्थापकांचा (Manager) आरोपींमध्ये समावेश आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राधेशाम सोहनी यांना प्रशासकांनी यापूर्वीच निलंबित केलेले आहे.

Exit mobile version