BEED24

देशातील टॉप-10 कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 8 जिल्हे; मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांचा समावेश.

मुंबई दि. 30 मार्च- देशभरात कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास सध्या चार राष्ट्रात कोरोनाचा धुमाकुळ सुरु आहे. चिली सारख्या देशात अक्षरशः दफनभुमी कमी पडत असल्याचे वृत्त येत आहे. देशात पश्चिम बंगालसह ५ राज्यांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडत असून लाखोंचा जनसमुदाय प्रचार सभांसाठी एकत्र येत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह (Maharashtra) काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मराठवाड्यातही (Marathwada) कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे.

(8 districts in Maharashtra among the top-10 Corona hotspot districts in the country; Includes two districts in Marathwada.)

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देशातील टॉप-१० कोरोना हॉटस्पॉट (top-10 Corona hotspot) जिल्ह्यांची आज घोषणा करण्यात आली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये पुणे जिल्हा अव्वल आहे. पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगलोर अर्बन, नांदेड, दिल्ली आणि अहमदनगर या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.

या टॉप-10 (top-10 Corona hotspot) जिल्ह्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यातील (Marathwada) औरंगाबाद व नांदेड या दोन जिल्ह्यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहिर केला असून यास कडाडुन विरोध होत असल्याचे दिसुन येत आहे.

राज्यात होणार पुनःश्च लॉकडाऊन ?
रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. राज्यातील अनेक शहरांत बेड्सची संख्या अपुरी पडू लागले आहेत. याच धर्तीवर रविवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत लॉकडाऊन (lockdown) सारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या लॉकडाऊन (lockdown) होणार की नाही ? याबाबत जनतेच्या मनात संभ्रम अधिक वाढत आहे. तर गेल्या लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अद्यापही सामान्य वर्गाला नीट करता आलेली नाही. अशातच पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने काहीशी भीती निर्माण झाली आहे.

Exit mobile version