किल्लेधारूर दि.२४(वार्ताहर) कंपनीकडून खाद्यतेल मिळवून देण्याचा खोटा करार करुन धारुर Dharur येथील व्यापाऱ्यास ९ लाख ३० हजार रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार घडला असून धारुर पोलिसात Police याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील व्यापारी आनंद रामचंद्र डुबे यांचे आनंद एजन्सी नावाचे धारुरमध्ये दुकान आहे. जालना येथील रेफकींग कटसया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी कृष्णा विजयकुमार सोनपेठकर याने कंपनीकडून खाद्यतेल पुरवठा करतो म्हणून आनंद डुबे यांच्या कडून यश मार्केटींग औरंगाबाद, नचिकेत मार्केटींग औरंगाबाद, श्रीकृष्णा प्रोव्हिजन ट्रेडींग कंपनी औरंगाबाद Aurangabad यांच्याशी खाद्यतेल डब्ब्यांचा सौदा करुन घेतला. संबंधित चौघांनी कंपनीच्या नावे डुबे यांच्या सोबत करार करुन रोख व बँकेद्वारे ९ लाख ३० हजार रुपये घेतले. मात्र वेळेत खाद्यतेल मिळत नसल्याने डुबे यांनी संबंधितांना संपर्क केला. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने डुबे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावरुन धारुर पोलिसात Police त्यांनी तक्रार दिली. धारुर Dharur पोलिसात कृष्णा विजयकुमार सोनपेठकर याच्यासह इतर कंपनीचे चालक रुपेश सकलेचा, गणेश सारडा, बाळू मुळे यांच्या विरोधात भादवि ४२०, ३४ नुसार फसवणूकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस Police निरिक्षक सुरेखा धस करत आहेत.