BEED24

एक दोन नव्हे तब्बल ५० महिलांचा विनयभंग करणारा विकृत गजाआड…

मुंबईः दि.१८- दहा वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल ५० महिलांशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग (molested) करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या ३० वर्षीय व्यक्तीस पोलिसांनी अटक केली असून तब्बल ४० गुन्हे नोंद असलेल्या व १२ वेळा अटक होवून निर्डावलेल्या या व्यक्तीस वठनीवर आणण्याचे काम आता पोलिस (Police) करणार आहेत.

२०११ मध्ये एका महिलेबरोबर अश्‍लील वर्तन केल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरुन त्याला पहिल्यांदा अटक झाली होती. या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने किमान ५० महिलांसोबत तसेच अश्‍लील (Obscene) कृत्य केल्याचे दिसून आले. १२ डिसेंबर रोजी दिंडोशी पोलिस ठाण्यांतर्गत २४ वर्षीय महिलेचा विनयभंग (molested) झाला. पिडीत महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. एका व्हिडिओत सदर आरोपी महिलेबरोबर अश्‍लील कृत्य करताना दिसून आला. या व्हिडिओवरून पोलिसांना आरोपीचा दुचाकी क्रमांक सापडला आणि त्याची ओळख पटली. परंतु, वारंवार घर बदलल्यामुळे पोलिस (Police) त्याच्यापर्यंत सहज पोहोचू शकत नव्हते. परंतु इलेक्‍ट्रॉनिक सर्व्हिलान्सच्या मदतीने मंगळवारी त्याला भादवि (IPC) च्या ३५४ (महिलेचा विनयभंग) आणि धमकी देण्याच्या (५०६) आरोपाखाली अटक करण्यात आली. अटक केलेल्या ३० वर्षीय व्यक्तीचे नाव कल्पेश देवधर असे आहे. व्यवसायाने चालक असलेला कल्पेश महिलांची छेडछाड करण्यासाठी स्पोर्टस बाइक वापरत असे. तो एकट्या जाणाऱ्या महिला, मुलींसमोर आपली दुचाकी उभी करून आधी बोलायचा त्यानंतर त्यांच्याशी अश्‍लील कृत्य करून फरार व्हायचा. बऱ्याच वेळा तो मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत जायचा आणि अश्‍लील (Obscene) हावभाव करत असे. आरोपींच्या अटकेनंतर कल्पेशच्या कृत्यास बळी पडलेल्या पवई परिसरातील एका महिलेचा शोध लागला. सदरील आरोपी नुकताच डीएन नगर पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता. कल्पेश देवधर काही वर्षांपूर्वीपर्यंत आपली आई आणि तीन भावांबरोबर मलाड वेस्टमध्ये राहत होता. पण त्याच्या या वागण्यामुळे कुटुंबीयांनी त्याला घराबाहेर काढले होते.

Exit mobile version