BEED24

एसटी कर्मचाऱ्यांची दुसरी टिमही कोरोनाच्या विळख्यात; पुन्हा ८ कर्मचारी पॉझिटीव्ह

किल्लेधारूर दि.१५(वार्ताहर) येथील बस ST आगारातील मुंबईहून Mumbai आलेल्या दुसऱ्या टिम मधील २४ कर्मचाऱ्यांची आज दि.१५ रोजी ॲन्टीजन Antigen तपासणी करण्यात आली असुन यात ८ जन पॉझिटीव्ह Positive आढळली आहेत. एकुण ४६ पैकी २६ जनांची तपासणी करण्यात आली. यापुर्वीही दि.९ रोजी आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ७ जन बाधित आढळले होते. सदरील कर्मचाऱ्यांपैकी अनेक जन तपासणी करत नसल्याचे दिसून येत असुन एस.टी. ST प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेवून तपासणी बंधनकारक होण्यासाठी कठोर भुमिका घेणे गरजेचे झाले आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या कमी होत असताना मुंबई Mumbai येथे काम करणाऱ्या एस.टी. ST कर्मचाऱ्यांच्यात पॉझिटीव्ह Positive आढळून येण्याचे प्रकार वाढले आहे. महामंडळाकडून सध्या अनेक आगारातील बसेस व कर्मचारी मुंबईत सेवा देत आहेत. धारुर आगारातून सध्या मुंबईच्या सांताक्रुझ व बांद्रा भागात ११ बसेस व ४४ चालक व वाहक पाठवण्यात आली आहेत. आठ दिवस काम करुन सदरील ४६ कर्मचाऱ्यांची दुसरी टिम परतली असुन त्यांची व त्यांच्या संपर्कातील अशा एकुण ४६ जनांची यादी कोविड-१९ covid-19 ची ॲन्टीजन Antigen व आरटीपिसीआर Swab तपासणीसाठी कोविड सेंटरवर देण्यात आली आहे. परंतू यापैकी केवळ २६ कर्मचाऱ्यांची ॲन्टीजन तपासणी झाली असुन यात ८ जन पॉझिटीव्ह Positive आली आहेत. तर २८ स्वॅब पाठवण्यात आली आहेत. गेल्याच आठवड्यात याच आगारातील ३२ जनांची तपासणी होवुन ७ जन कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. उर्वरित कर्मचाऱ्यांनी मात्र तपासणी केली अथवा नाही याची शहानिशा होत नाही.

Exit mobile version