बीड दि.16 मार्च – हैद्राबादला (Hyderabad) जाणाऱ्या मित्राला परळी रेल्वेस्थानकावर सोडून परतणाऱ्या दोन मित्रांच्या स्कुटीला (scooter) अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री वडवणीजवळ घडली.
( A tragic accident near Wadwani; The unfortunate death of two friends on a scooter. )
मित्राला परळी येथे रेल्वे स्टेशनवर (Parli Railway Station) सोडून स्कुटी वरुन परतताना वडवणीच्या (Wadwani) पुढे रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने समोरासमोर जोरात धडक दिली. या अपघातात स्कुटीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. दोघांनाही अत्यवस्थ अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
सदर अपघात (Accident) इतका भीषण होता की, स्कुटीचा अक्षरशः चुराडा झाला असून घटनास्थळी रक्तचा सडा पडला होता. हाफेज मारुफ फारोखी ( वय 23) रा. बशीर गंज बीड, शाहेद बागवान ( वय २१ वर्ष ) रा. बीड असे मयत मित्रांची नावं आहेत. हे दोघेही हैद्राबादला जाणाऱ्या मित्राला परळी येथे रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेले होते.
मित्राला सोडून स्कुटी क्रमांक एम.एच. 23 बी डी. 2500 वरुन दोघे बीडकडे (Beed) येत होते. यावेळी वडवणी-घाटसावळी दरम्यान रात्री समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोघांनाही मार लागून गंभीर जखमी झाले होते. उपचारापुर्वीच दोन तरुण मित्रांच्या मृत्यूने कुटूंबियांना मोठा धक्का बसला. अज्ञात वाहनाचा पोलिस (Police) तपास घेत आहेत.