BEED24

अबब… बालिकेच्या नाकातून निघाल्या २४ जीवंत अळ्या…

परळीः-दि.२३(वार्ताहर) ९ वर्षाच्या बालिकेच्या नाकातून तब्बल 34 आळ्या larvae निघाल्याची घटना परळी येथील एका खाजगी रुग्णालयात घडली. सदरील मुलीवर पुढील उपचार सुरु असुन सदरील प्रकाराकडे गांभिर्यांने घेवून आपल्या लहान बालकांकडे अधिक लक्ष देवून काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका लहान मुलीच्या नाकातून एक-दोन नाही तर तब्बल 34 आळ्या larvae काढण्याची शस्त्रक्रिया परळी Parli येथे करण्यात आली आहे. येथील डॉक्टर संतोष मुंडे Dr. Santosh Munde यांनी ही शस्त्रक्रिया केली असून या चिमुकलीवर पुढील उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर मुंडे यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार परळी Parli तालुक्यातील एका नऊ वर्षीय मुलीच्या नाकातून 34 आळ्या larvae निघाल्या आहेत. सतत होणाऱ्या सर्दीकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार होऊ शकतो. धुळीच्या इन्फेक्शनमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळून येतो. आपल्या लहान बालकाच्या सवयी व आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन डॉक्टर संतोष मुंडे  Dr. Santosh Munde यांनी यावेळी केले.

Exit mobile version