BEED24

अभिजीत आवरगावकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन..

किल्लेधारूर दि.17 अॉगस्ट – मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारीणी सदस्य अभिजीत विजयसिंह आवरगावकर (वय 36) यांचे हृदयविकाराच्या (heart attack) धक्क्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास निधन झाले.

(Abhijeet Awargaonkar dies of heart attack ..)

कै.रामराव आवरगावकर यांचे नातू तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अभिजीत आवरगावकर यांचे हॉटेल व्यवसायासह शिक्षण मंडळात मोठे नाव होते. औरंगाबाद (Aurangabad) येथे दि.16 सोमवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. यातच त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अभिजीत आवरगावकर यांनी मशिप्र मंडळाच्या देवगिरी ग्लोबल (Devgiri global) व्हॕली इंटरनॅशनल स्कुलच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रातील न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या निधनामुळे त्यांचे मुळगाव आवरगाव, किल्लेधारूर (Dharur), तालुक्यासह औरंगाबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Exit mobile version