BEED24

accident धारुर घाटात विचित्र अपघात ; कंटेनर, क्रुझर व टिप्परमध्ये दुचाकी अडकली.

किल्लेधारुर दि.23 जुलै – धारुर घाटात Dharur Ghat आज दि.23 जुलै रविवारी पावणे नऊ ते नऊच्या सुमारास विचित्र अपघात झाला. या अपघातात accident दुचाकीस्वार गंभीर जखमी असून अद्याप अपघातस्थळी मदत पोहोचली नाही. ( accident … Strange accident in Dharur Ghat; Two wheeler got stuck in container, cruiser and tipper.)

अवघड वळणामुळे सतत अपघात होत असलेल्या धारुर घाटात Dharur Ghat आज सकाळी पुन्हा विचित्र अपघात झाला. घाटातील एका अवघड वळणावर अधिच अपघातग्रस्त असलेल्या कंटेनरजवळ हा अपघात accident झाला. प्रथमदर्शनी सदर अपघातात दुचाकीस्वाराला मागून धडक बसल्याने दुचाकी (क्र. एमएच 23 जे 9310) समोर असलेल्या क्रुझरला (क्र. एमएच 13 जेइ 1417) मागून धडकल्याचे दिसत आहे. अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. जखमी हा महेश लाखे नावाचा पाणी फाऊंडेशनचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक  माहिती मिळाली. सदरील अपघाताची छायाचित्रे सोशल माध्यमात व्हायरल झाली आहेत.  या अपघातस्थळी अद्याप मदत पोहोचली नसून जखमीचे नावही कळू शकले नाही.

Exit mobile version