किल्लेधारूर दि.5 अॉक्टोंबर – शहरातील युवक सतीश सुभाषराव सोनटक्के (वय 35) यांचे नित्रुड ता. माजलगाव येथे रात्री (दि.4) अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
(Accidental death of a young hotel driver in Dharur; Unidentified tipper hits the bike.)
धारुर (Dharur) शहरातील हॉटेल व्यवसायिक सुभाष सोनटक्के यांचे ज्येष्ठ चिरंजीव सतीश हे दि.4 सोमवारी धारुरहून माजलगावकडे आपल्या दुचाकीवरून जात होते. राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र.548 सी या रस्त्यावर नित्रुड ता. माजलगाव जवळ अज्ञात टिप्परने धडक दिल्याने त्यांचा अपघात (Accident) झाला.
या अपघातानंतर टिप्पर पसार झाले. मात्र सतीश यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू (Accidental death) झाला. त्यांच्या अपघाताचे वृत्त धारुर शहरात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येथील स्टेट बँक अॉफ इंडीया (SBI) माजलगाव रोड शाखेजवळ त्यांचा चहा नाष्ताचे हॉटेल आहे. ते माजलगावकडे आपल्या सासरी गेलेल्या पत्नी व लेकरांंच्या भेटीसाठी जात असल्याची माहिती कळाली.
सतीश सोनटक्के यांचा अत्यंत शांत व संयमी स्वभाव असल्याने ते सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव माजलगाव (Majalgoan) येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून आज दि.5 रोजी धारुर येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळाले. सोनटक्के कुटूंबियांच्या दुखात Beed24 न्यूज परिवार सहभागी आहे.