बीड दि.29 अॉगस्ट – बीड (Beed) शहरात शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणास ताब्यात घेतले. त्याच्या विरुध्द कलम 3/25 भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे बीड पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(Accused carrying village pistol with live cartridge …)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दि. 28 शनिवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी बीड (Beed) शहरात पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) सतीष वाघ यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रॉयल ज्युस बार अॅक्सीस बँक (Axis Bank) समोर अक्षय लाड नावाचा इसम उभा असुन तो विनापरवाना बेकायदेशीररित्या त्यांचे कंबरेला गावठी पिस्टल लावुन थांबलेला आहे.
मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार यांना बातमीची ठिकाणी पाठविले असता सदर अधिकारी व अमलदार यांनी सापळा लावुन दिलेल्या बातमीमधील वर्णनाच्या इसमास ताब्यात घेतले. त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांने त्याचे नाव गाव अक्षय व्यकटराव लाड (वय 22) वर्षे रा.माळीवेस कोतवाल गल्ली बीड असे सांगितले. सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचे कंबरेला एक गावठी पिस्टल व मॅग्झीन मध्ये एक जिवंत राऊंड मिळुन आला. त्यास हत्यार बाळगण्याचा परवाना आहे काय असे विचारले असता त्यांने परवाना नसल्याचे सांगितले.
त्यावरुन सदर इसमाकडुन गावठी पिस्टल व राऊंड असे 50500/-रुपयाचा मुदेमाल जप्त करुन त्यास पो.स्टे.शिवाजीनगर बीड येथे हजर करुन त्यांचे विरुध्द कलम 3/25 भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अमलदारांनी केली आहे.