किल्लेधारुर दि.18 अॉक्टोंबर – मंगळवारी (दि.१७) पहाटे मोटारसायकल चोरास रंगेहात पकडून पोलिस ठाण्यात आणलेला आरोपी ठाण्याच्या आवारातून पळाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. ( accused ran away… The accused ran away from Dharur police station.)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर Dharur पोलिस ठाणे police station हद्दीतील गोपाळपुर या गावात ग्रामस्थांनी पहाटे मोटारसायकल चोरताना चोरांना पाहिले. यातील एका चोरास पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. सदर आरोपीस लोकांनी धारुर पोलिस ठाण्यात police station आणले. मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असताना सदर आरोपीने पोलिस ठाण्याच्या आवारातून सगळ्यांना गुंगारा देवून धूम accused ran away ठोकली. आरोपीला पकडण्यासाठी ग्रामस्थ व पोलिस सिनेस्टाईल पाठलाग करत होते. मात्र आरोपीने कपाऊंडवरुन उडी टाकून पोबारा केला. त्याला पकडण्यात यश आले नसून पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे कळते. सध्या नवरात्री सुरु असल्याने पोलिस ठाण्याच्या रस्त्यावर अंबाचोंडी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी आहे. सदर प्रकार अनेकांनी पाहिल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याप्रकारानंतर धारुर Dharur पोलिस ठाण्यात एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा नोंद झाल्याची माहिती मिळाली.