BEED24

७५ दिवसांनी झाला खूनाचा उलगडा…. दोन अल्पवयीन मुलांचे कृत्य

दौंड: दि.१९- तब्बल ७५ दिवसांनी दौंड शहरातील छायाचित्रकार केदार भागवत यांचा खून (Murder) दोन अल्पवयीन मुलांनी लुटीच्या उद्देशाने केल्याचे उघडकीस आले आहे. पुणे (Pune) ग्रामीण पोलिस (Police) दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणि दौंड पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. एका प्रकरणात कसुन चौकशी केल्यानंतर आरोपी पैकी दोघांनी खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दौंड तालुक्यातील छायाचित्रकार केदार श्रीपाद भागवत (वय ४६, रा.शालीमार चौक, दौंड) यांचा ४ ऑक्टोबर रोजी दौंड-लिंगाळी रस्त्यालगत काळे मळा येथील कालव्याजवळ डोक्यात दगड घालून खून (murder) करण्यात आला होता. दौंड पोलिसांनी विविध शक्यता पडताळून खुनाचा तपास केला परंतु दोन महिन्यानंतरही कोणतेही धागेदोरे मिळाले नव्हते. दरम्यान ५ डिसेंबर रोजी दौंड-कुरकुंभ रस्त्यावर एका खासगी कंपनीतील विक्री अधिकारी असणारे संजय मिश्रीलाल मुनोत (रा. दौंड) यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (Crime branch) तीन आरोपींना आणि लुटीचा माल घेणाऱ्या एका तरूणाला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यापैकी दोघांनी केदार भागवत यांचा खून केल्याचा उलगडा झाला.

अशी घडली घटना…

४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दौंड शहरातील जयहरी चौक ते शालीमार चौक दरम्यान दोन अल्पवयीन आरोपींनी केदार भागवत यांना लिफ्ट देऊ केली. दुचाकीवर गप्पा मारत बोरावकेनगर येथून तिघे काळे मळा येथील कालव्याजवळ आले. अंधारात दोघांनी भागवत यांच्या कडे पैशांची मागणी केली. परंतु भागवत यांच्या खिशात फक्त वीस रूपयेच मिळाल्याने दोघांनी भागवत यांना बेदम मारहाण केली. येवढंच नाही तर मारहाण करण्यासह डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून (murder) केला. सदरील घटनेची उकल तपासात झाला.

पुणे (Pune) ग्रामीणचे पोलिस (Police) अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (Crime branch) वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, दौंडचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे, महिला फौजदार अमृता काटे, सहायक फौजदार दिलीप भाकरे, हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत, सचिन बोराडे, कॉन्स्टेबल नीलेश वाकळे, दगडू वीरकर आदींनी गुन्हा उघडकीस आणला.

Exit mobile version