BEED24

शिवसेनेचे नेते वन मंत्री राठोड यांच्या नंतर राष्ट्रवादीच्या या नेत्यावर आले संकट….

पुणेः दि.१७- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan suicide case) शिवसेनेचे नेते तथा वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत येत नाही तोच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरूणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला तात्काळ न्याय मिळवून द्यावा नसता आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

वर्षअखेरीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर तरुणीने थेट बलात्काराचा (Rape) आरोप केला होता. राज्यात पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan suicide case) चर्चेत असताना या तरुणीने काल मला न्याय मिळाला नाही तर मी पाच दिवसाच्या आत आत्महत्या करणार. इतकंच नाही तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असं पीडित तरूणीने म्हटलं आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि पीडित तरुणीने पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं तृप्ती देसाई (Trupti Desai) म्हणाल्या.

औरंगाबाद शहरातील बायजीपुरा भागात राहणाऱ्या व खाजगी शिकवणी घेणार्‍या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार (Rape) केल्याचा आरोप मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर करण्यात आला होता. मात्र मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. आता तब्बल तीन महिन्यानंतर पीडित तरूणीने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला इशारा दिला आहे.

या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना शेख यांनी आपण निर्दोष असून माझी नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी मेहबूब शेख यांना पत्रकार परिषदेत रडू आलं होतं. यानंतर पोलिसांनीही शेख यांना तांत्रिक प्रकरण म्हणून क्लिन चिट दिली होती. पुजा चव्हाण प्रकरणी राज्यातील राजकीय परिस्थिती स्फोटक बनलेली असताना सदरील पिडीत तरुणीने काल तृप्ती देसाई (Trupti Desai) यांच्यासह पत्रकार परिषद घेवून खळबळ उडवून दिली आहे.

Exit mobile version