BEED24

अजितदादा पवार कोरोनामुक्त; आठ दिवस घेणार विश्रांती

मुंबई : दि.२- राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार Ajit Pawar यांना कोरोनाची Corona लागण झाल्या नंतर उपचारांसाठी ब्रीच कँडी Breach Candy रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सोमवारी दि.२ रोजी ते कोरोनामुक्त झाले असुन ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना काळात सर्वाधिक काळजी घेणारे अन दौरे करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा दि.२३ आक्टोंबरला कोरोना Corona पॉझिटीव्ह आले होते. आज ते कोरोनामुक्त झाले.  याबाबत स्वतः अजित पवार Ajit Pawar यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर माहिती शेअर केली आहे. ब्रीच कॅन्डी Breach Candy रुग्णालयातून काही वेळापुर्वी त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. पुढचे आठ दिवस ते विश्रांती घेणार असुन राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह NCP राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Exit mobile version