BEED24

आजचे सर्व पॉझिटीव्ह रुग्ण शहरातील; पहा किती व कोणत्या भागातील आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या १३ ॲन्टीजन (antigen) तपासणीत ३ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. तर काल पाठवण्यात आलेल्या ५ स्वॅब (Swab) पैकी २ पॉझिटीव्ह (positive) रुग्ण आढळली आहेत. आजचे सर्व पॉझिटीव्ह रुग्ण शहरातील रहिवासी आहेत.

आज १३ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या. या तपासणीत ३ पॉझिटीव्ह आढळली असून १० निगेटिव्ह आले आहेत. काल पाठवलेल्या ५ स्वॅब (Swab) नमुन्यापैकी २ पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाली आहेत. आज ८ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ७३ वर्षीय स्त्री, क्रांती चौक, धारुर

२. ४८ वर्षीय स्त्री, क्रांती चौक, धारुर

३. ४५ वर्षीय पुरुष, संभाजी नगर, धारुर

स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले

४. २५ वर्षीय पुरुष, पाटील गल्ली,धारुर

५. ३८ वर्षीय पुरुष, कसबा, धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version