BEED24

देशात चिंतेचे वातावरण; कोरोनाचे पाय पसरण्यास सुरुवात, दहा राज्यात आढळले रुग्ण.

नवी दिल्ली दि.12 एप्रिल – देशात सध्या विविध राज्यात चिंतेचे वातावरण असून गेल्या चोवीस तासात 1 लाख 52 हजार 879 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रूग्ण आढळून आले आहेत. देशाच्या विविध भागात पुन्हा कोरोना खूप वेगाने फैलावत आहे. मात्र यातील सुमारे 70.82 टक्के रूग्ण पाच राज्यांतच केंद्रीत झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

(An atmosphere of concern in the country; Corona legs began to spread, patients found in ten states.)

देशात कोरोनाचे सक्रिय बाधित रुग्ण 11 लाख 8 हजार 87 इतके असून त्यातील 48.57 टक्‍के कोरोना बाधित एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र (Maharashtra), छत्तीसगड, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि केरळ या पाच राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 55 हजार 411 नवीन रूग्ण आढळून आले असून छत्तीसगड मध्ये 14 हजार 98 व उत्तरप्रदेशात 12 हजार 748 करोना रूग्ण आढळून आले आहेत.

वरील पाच राज्यांखेरीज तामिळनाडु, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यांमध्येही कोरोना बाधितांची (Corona Positive) लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्याही रोजच्या रोज वाढत असून गेल्या 24 तासांतील मृतांचा आकडा 839 इतका आहे. त्यात महाराष्ट्रातील मृतांचे प्रमाण 309 इतके आहे. मात्र गेल्या 24 तासांत दहा राज्यांत कोरोनामुळे एकाचेही निधन झालेले नाही.

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आलेली आहेत. परंतू दिवसेंदिवस कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग वाढतच असून आता राज्य शासन संपूर्ण लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत आहे. महाराष्ट्रात आवाक्याबाहेर जात असलेला कोरोना विषाणू संसर्ग हळूहळू देशात पाय पसरत असल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत देशातील दहा राज्य कोरोनाच्या विळख्यात आली असल्याने देशासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version