BEED24

अन पंकजा मुंडे म्हणाल्या…. ‘माझ्या सगळ्या माणसांना फोडू नका…’

मुंबईः दि.१२- सध्या सोशल मेडियात भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांच्या ‘माझ्या सगळ्या माणसांना फोडू नका…’ या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत असून हे वाक्य मात्र झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) च्या आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या एका मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या चित्रिकरण प्रसंगीची आहेत.

हास्याचे फवारे उडवणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात अनेक दिग्गज हजेरी लावतात. छोट्या पडद्यावर अत्यंत लोकप्रिय असलेल्या या कार्यक्रमात भल्या भल्यांची मिमीक्री करत हास्यरंग भरले जातात. अशाच एका लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडमध्ये राजकीय हास्यकारंजे उडताना दिसणार आहेत. महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहेत. भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) शरद पवार यांचे नातू आणि (NCP) चे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) महाराष्ट्रातील हे युवा चेहरे CHYD च्या मंचावर दिसणार आहेत. याच कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी देखील या पती अमित पालवे यांच्याबरोबर उपस्थिती दर्शवली आहे. सुजय विखे पाटील देखील त्यांची पत्नी धनश्री विखे यांच्याबरोबर उपस्थित होते.

‘माझ्या सगळ्या माणसांना फोडू नका…’

या मंचावर उपस्थित जोडप्यांना रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा खेळ खेळण्यास सांगितलं होतं. यामध्ये एक वस्तू घड्याळही होती. आश्चर्याची बाब म्हणजे सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांची पत्नी आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे पती या दोघांनीही घड्याळावर रिंग टाकली. यावेळी पंकजा मुंडेनी रोहित पवार यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. त्यांनी असं म्हटलं की, तुम्ही माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना फोडू नका. त्यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील चोख उत्तर दिलं आहे. ‘घरच्यांना माहित असतं की आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे’, अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंना उत्तर दिलं आहे. लवकरच हा एपिसोड (Chala Hawa Yeu Dya) CHYD च्या कार्यक्रमात प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version