BEED24

धारुरचा आणखी एक कोरोना बळी…. मृतांची संख्या २४

किल्लेधारूर दि.२४(वार्ताहर) शहरातील ६७ वर्षीय वृध्द महिलेचे अंबाजोगाई येथे कोरोना वर उपचार सुरु असताना आज दि.२४ शनिवारी सकाळी ७.४५ वाजता निधन झाले आहे. कोरोना (Corona) बळीत धारुरचा हा चोविसावा बळी (Death) ठरला आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. धारुर शहर व तालुक्यातही कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रुग्ण दगावण्याचे प्रमाण ३.५ टक्के आहे. शहरातील एक ६७ वर्षीय वृध्द महिला दि.१८ आक्टोंबर रोजी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने उपचारासाठी दाखल झाली होती. त्यांच्या वर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात सलग सहा दिवस २१ तास उपचार करण्यात आले. मात्र आज दि.२४ रोजी सकाळी ७.४५ वाजता त्यांचे निधन झाले. तालुक्यातून कोविड-१९ (Covid-19) लागण होवून मृत (Death) पावणारे त्या २४ वे ठरल्या. तालुक्यात आजपर्यंत ६९६ जनांना कोविड-१९ (Covid-19) ची लागण झाल्याची नोंद असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी सांगितले.

Exit mobile version