BEED24

बीड जिल्ह्यातील आणखी एक नेता कोरोना पॉझिटीव्ह; राज्यात 25 आमदार बाधित.

अंबाजोगाई दि.3 जानेवारी – भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दोन दिवसापूर्वी ओमायक्रोनची लागण झाल्यानंतर आता आज (दि.३) भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांची ही कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.सोशल मीडियावर त्यांनी स्वतः या बाबत माहिती दिली आहे.

(Another leader in the Beed district, Corona Positive; 25 MLAs affected in the state.)

राज्यातील 10 मंत्री व 25 आमदार कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. या पाठोपाठ भाजपाचे युवा नेते केज (Kaij) मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा (Akshay Mundada) हे कोरोना बाधित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे.

याची माहिती त्यांनी स्वतः फेसबुकवर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी (Corona Test) करून घ्यावी व आपली काळजी घ्यावी असे आवाहन अक्षय मुंदडा यांनी केले आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात यापूर्वी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे (Vinayak Mete) कोरोना बाधित आढळले होते. यानंतर भाजप नेत्या (BJP Leader) पंकजा मुंडे व आता भाजप आमदार पती अक्षय मुंडदा बाधित आढळले आहेत. राज्यभरात सध्या नेते व अभिनेते मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळत आहेत.

 

Exit mobile version