BEED24

गावांच्या विकासासाठी आणखी २९ हजार कोटी रुपयांचा निधी- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: दि.२०- राज्यातील ग्रामपंचायतींना गावांच्या विकासासाठी आणखी २९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केली.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील गावांना देण्यात येणारे स्मार्टग्राम (Smart village) आणि आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सरपंच आणि ग्रामसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याआधी ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून मुबलक निधी मिळाला आहे. पण हा निधी समाजाचा असतो. त्यामुळे या निधीचा वापर हा गावे आणि शाळा सुंदर व स्वच्छ करण्यासाठी झाला पाहिजे. शिवाय या निधीतील पैसा हा चांगल्या कामासाठी लावा आणि गावे स्वयंपूर्ण बनवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी पुणे जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांना दिला.

पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीचा निधीही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कसा गावाला मिळेल, याचा पालकमंत्री या नात्याने मी पाहत असतो. परंतु या निधीचा विनियोग गावकारभाऱ्यांनी चांगल्या काममासाठी करुन गावाला स्मार्टग्राम (Smart village) करावे. निवडणुकीसाठी गावातील खालची-वरची आळी पालथी घालतो. पण निवडून आल्यानंतर ग्रामसेवकाला सहीसाठी सरपंच, सदस्यांना शोधावे लागते, असे होता कामा नये असे सुनावले.

Exit mobile version