किल्लेधारूर दि.15 फेब्रुवारी – धारूर येथील गरीब कुटुंबातील कलाकार रमेश मैंद याची आता छोट्या पडद्यावर इंट्री झाली आहे. कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या बाळु मामा ( Balu Mama ) या मालिकेत तो मेंढ्यांचा वैद्यची भूमिका साकारत आहे. दि.14 फेब्रुवारीपासून सदरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
( Another small screen entry from Dharur; He is playing an important role in this series. )
रमेश मैंद याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. विविध भूमिका करणारा कलाकार म्हणून तो परिचित आहे. येथील महाविद्यालयामध्ये विविध नाटकात त्याने भुमिका साकारल्या आहेत. रमेश याने नाट्यमहोत्सवात स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. औरंगाबाद ( Aurangabad ) येथे झालेल्या नाट्य महोत्सवामध्ये रमेश मैंद या कलाकाराचा अभिनय चांगलाच गाजला.
विविध नाट्यातील भूमिका हुबेहूब साकारून त्याने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. अल्पावधीतच हा छोटा कलाकार कॉमेडी ( comedy ) मॅन म्हणून संपूर्ण औरंगाबाद मध्ये परिचित झाला. नाट्य महोत्सवातून विविध नाटकातील अभियानातून त्याने अनेक पुरस्कार मिळवले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने त्याचा उत्कृष्ट अभिनय करणारा व्यक्ती कलाकार म्हणून देखील त्याला गौरविण्यात आले.
युट्युबवर सुरू असलेल्या 4 वेबसिरीज ( Web series ) मध्ये त्यांनी धमाल कॉमेडी करून चांगलीच खळबळ माजवली आहे. चांडाळ यांचा धुमाकूळ, एक गाव शंभर नंबरी, चांडाळ चौकडी, तारांबळ अशा विविध वेबसिरीज मध्ये त्याने त्याच्या अभिनयाची कला दाखविली आहे. त्याचा उत्कृष्ट अभिनय पाहून कलर्स वाहिनीने त्याला मुख्य भुमिका दिली आहे.
सध्या तो या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना भुरळ घातली आहे. ही मालिका 14 फेब्रुवारी पासून कलर्स वाहिनीवर दररोज रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी दाखवली जात आहे.
धारूर ( Dharur ) सारख्या छोट्या गावात राहत अभिनयाची आवड जपणारा रमेश मुंबई येथे जावून छोट्या पडद्यावर आपला अभिनय गाजवत आहे. यामुळे बीड ( Beed ) जिल्ह्यात त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जिल्ह्याची तसेच धारूर तालुक्याची मान त्याने उंचावली असल्याने धारूरसारख्या तालुक्यातून नवीन स्वरूपात अभिनय करणाऱ्या कलाकारांना वाव मिळणार आहे. रमेशचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
रमेश मैंद या नवोदित कलाकाराने अतिशय गरिब परिस्थितीवर मात करत आपली आवड जपली आहे. अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी जीव ओतून काम करत आहे. यापुर्वीही धारुर शहरातून सिने अभिनेता सुहास सिरसट याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रमेश मैंद हा देखील सिने व नाट्यक्षेत्रात गावाचे नाव उंचावणार अशी अपेक्षा धारुरकरांतून व्यक्त होत आहे.