BEED24

धारुरनजीक अरूंद रस्त्याचा आणखी एक बळी; एक गंभीर जखमी.

किल्ले धारूर दि.21 – धारूर कडून तेलगाव कडे जात असलेली स्विफ्ट डिजायर गाडी क्रमांक एम एच 20 बी एन 4200 चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या बाहेर जाऊन लिंबाच्या झाडावर आदळली. यात एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी आहे. Another victim of a narrow road near Dharur; One seriously injured.

देवगाव येथील आसाराम नागरगोजे (वय 38) असे मृताचे नाव आहे तर बाळू मुरकुटे ( वय 32) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी स्वामी रामनंद तीर्थ रुग्णालय आंबेजोगाई येथे हलवण्यात आले आहे. धारुर ते तेलगाव या राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र.548 सी अपघात होवून बळी जाणे हे नियमीतचेच झाले असून वाहनधारकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसांपासून घाटात राष्ट्रीय महामार्गा वर 12 कि.मी. रस्ता अरूंद असल्याने अपघाताच्या घटनेचे प्रमाण वाढले आहे. मागील पंधरा दिवसा खलीच येथील पत्रकार दिगांबर शिराळे यांचा अपघात झाला होता. याचा तपास ही अद्याप पूर्ण झालेले नाही तो पर्यत याच अरुंद रस्त्यावर पुन्हा अपघात ( Accident ) होऊन एकास जीव गमवावा लागला आहे.

धारूर ( Dharur ) कडून तेलगाव कडे जात असलेली स्विफ्ट डिजायर अरणवाडी जवळ झाडावर आदळून चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आरणवाडी फाट्या जवळ घडली आहे. यात चालक देवगाव येथील आसाराम नागरगोजे वय (३८) हे ठार झाले आहेत तर बाळू मुरकुटे (३२) हे गंभीर जखमी झाले असून प्राथमिक धारूर ग्रामीण रुग्णालयात करत पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. या अरुंद रस्त्यावर आणखीन किती बळी जाणार असा सवाल येथील नागरिक करत आहेत. अपघातस्थळी नागरीक तात्काळ मदतीला धावले.

( Another victim of a narrow road near Dharur; One seriously injured. )

Exit mobile version