BEED24

जनरल बिपीन रावत यांना घेवून जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; 13 मृतदेह सापडले.

नवी दिल्ली दि.8 डिसेंबर – तामिळनाडूच्या कन्नूर येथे बुधवारी लष्कराचे Mi-17 हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हे चॉपर (Chopper) भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief of Defense Staff) जनरल बिपीन रावत आणि इतर दोन अधिकाऱ्यांना घेऊन जात होते.

(Army helicopter carrying General Bipin Rawat crashes; 13 bodies found.)

जनरल रावत यांच्यासह एकूण 14 जण यात प्रवास करत होते. रावत हे गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव पथकाने आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृतांची ओळख डिएनए चाचणीतून (DNA Test) करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मोदी आज संध्याकाळी मंत्रीमंडळाची बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लवकरच या घटनेची माहिती राज्यसभेत देणार आहेत. दरम्यान, सिंह यांनी रावत यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. रावत यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत होते एकत्र 
यात रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही समावेश होता. त्यातील 13 जणांचे मृतदेह सापडले असून रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. वृत्तसंस्था एनएनआयच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी डॉक्टर, लष्करी अधिकाऱ्यांसह कमांडो उपस्थित आहेत. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहांची अवस्था अतिशय वाइट होती. ते पूर्णपणे भाजले होते.

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्थ झाल्याचे दिसत आहे. क्रॅश होताच हेलिकॉप्टरमध्ये (Army helicopter) आगीचा भडका उडाला. स्थानिक नागरिक व पोलिसांनी तात्काळ मदत पोहोचवली. नेमाका अपघात कसा झाला याबाबत स्पष्टता नाही. या दुर्घटनेची उच्चस्तरीय  चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जनरल बिपीन रावत (General Bipin Rawat) यांच्याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. जनरल बिपिन रावत 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख पदावर होते. यानंतर 1 जानेवारी 2020 मध्ये त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ हे पद देण्यात आले.

हेलिकॉप्टरमधील लोकांच्या  यादीत बिपिन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिद्दर, लें. क. हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक. जितेंद्र कुमार, ले. नायक विवेक कुमार, ले. नायक बी. साई तेजा, हवलदार सतपाल यांचा समावेश आहे.

 

Exit mobile version