BEED24

‘रामायण’मधील रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन.

मुंबई दि.6 अॉक्टोंबर – 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका (Ramayana) ‘रामायण’मधील रावणाची (Ravana) भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं (heart attack) निधन झालं. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(Arvind Trivedi, who played the role of Ravana in ‘Ramayana’, has passed away.)

अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या 3 वर्षांपासून ते शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करत होते. अशातच दोन ते तीन वेळा त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयातही दाखल करावं लागलं होतं.

साधारणतः महिन्याभरापूर्वी ते उपचारानंतर घरी परतले होते. मंगळवारी रात्री 9 ते 9.30 दरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं मृत्यू झाला. मुंबईतील कांदिवली येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.” तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “अरविंद त्रिवेदी यांच्यावर सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.”

रामानंद सागर (Ramanand Sagar) कृत ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेपासूनच अरविंद त्रिवेदी यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. त्यांनी साकारलेली रावणाची भूमिका (acting) लोकांच्या मनात इतकी ठसली होती की, त्यांना खऱ्या आयुष्यातही त्यांच्या भूमिकेवरुन ओळखू लागले होते. ‘रामायण’मध्ये काम करण्यापूर्वी गुजरातीत त्यांनी शेकडो नाटकं आणि चित्रपटांमधून अभिनय केला होता. अरविंद त्रिवेदी यांना कल्पना नव्हती की, रामायणातील त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय होईल.

रामायण मालिकेनंतर अरविंद त्रिवेदी यांनी ‘विक्रम और बेताल’ या हिंदी मालिकेतही काम केलं होतं. याशिवाय त्यांनी टेलिव्हिजन विश्वातील अनेक चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयानं ठसा उमटवला. गुजरातच्या साबरकांठामधून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि बहुमतानं विजयी देखील झाले. 1991 ते 1996 पर्यंत ते लोकसभेत खासदार होते. त्यांनी 300 हून अधिक गुजराती आणि हिंदी चित्रपटांमधून काम केलं आणि अनेक गुजराती नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

Exit mobile version