BEED24

कारखान्याच्या गव्हाणीत पडल्याने युवकाचा मृत्यू

बीडः-दि.१६(प्रतिनिधी) गव्हाणीतील कचरा काढत असताना पाय घसरुन गव्हाणीत पडुन चैन मध्ये अडकल्यामुळे युवक कामगाराचा मुत्यु (Death) झाल्याची घटना घडली आहे. महावीर (Mahaveer) माणिक गर्जे (१८) रा.हातोला ता.आष्टी(Ashti), जि.बीड असे त्या युवकाचे नाव आहे. सदरील घटना मंगळवेढा (Mangalveda) कारखान्यावर घडली.

आष्टी (Ashti) तालुक्यातील हातोला येथील माणिक गर्जे हे मंगळवेढा (Mangalveda) येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोडणी साठी गेले होते. मुलगा महावीर हा येथेच कामगार म्हणून कामावर होता. काल पहाटे ऊस टाकण्याच्या गव्हाणीतील कचरा काढत असताना पाय घसरुन गव्हाणीत पडुन चैन मध्ये अडकुन महावीरचा दुर्दैवी मृत्यु झाला. मयत युवकाचे वडील कारखान्यावर बैलगाडीने ऊस तोडणी करून ऊस वाहतूक करतात. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे मुलांना देखील वडिलांना हातभार लावावा लागत होता. महावीर (Mahaveer) हा सध्या बारावीत शिक्षण घेत होता. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शाळा बंद होत्या. घरची हलाखीची परिस्थिती व आई वडिलांना मदत म्हणून महावीर कारखान्यावरती रात्रपाळीला उसाच्या कांड्या गोळ्या करण्याच्या कामावर जावून आई वडिलांना हातभार लावत होता. पण अचानक मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याचा गव्हाणीत पडल्याने मुत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Exit mobile version