किल्लेधारूरः दि.२१(वार्ताहर) अपहरणाचा गुन्हा दाखल केला म्हणून फिर्यादी व त्यांच्या वडिलास काठ्या कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चोंडी येथे घडली असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आठ जना विरूध्द धारूर पोलीस (Police) स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सर्व आरोपी अद्याप फरार आहेत.
तालूक्यातील चौंडी येथे १५ डिंसेबर रोजी फिर्यादी अशोक मालूराम मुंडे यांचे घरा समोर आरोपी विलास आण्णा मुंडे व इतर सात जन रात्री आठच्या वेळी घरा समोर येऊन तुम्ही सांगोला पोलीस स्टेशनला आमचे विरूध्द अपहरणाचा गुन्हा का दाखल केला म्हणून विचारणा केली. मालूराम मुंडे व घरातील व्यक्ती समजूत काढत असताना आरोपींनी काठ्या, कुऱ्हाडी व इतर हत्याराने मारहाण केली. या मारहाणीत मालूराम मुंडे यांना गंभीर मार लागला असून सोलापूर येथे अतिदक्षता विभागात (ICU) शासकीय जिल्हा रुग्नालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादी अशोक मुंडे यांला हि डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांने दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी विलास आण्णा मुंडे सह आठ जना विरूध्द गु.र.न. ३२८/२०२० नुसार कलम ३०७, ३२५, ३२३, १४३, १४७, १४८ कलमा सह गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस (Police) उपनिरीक्षक प्रदीप डोलारे हे करत आहेत. गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार आहेत.