BEED24

अखेर त्या मयताची ओळख पटली….

पाटोदा दि.१(प्रतिनिधी) अंमळनेर परिसरात अनोळखी इसमाचा चेहरा विद्रुप केलेला मृतदेह आढळून आला होता. पोलीसांच्या प्रयत्नाने त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात  यश आले असुन सदरील व्यक्ती हा साबळेवाडी येथील बांधकाम कारागीर दिलीप विठोबा साबळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र हा खुन नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा उलगाडा करण्याचे मोठे आवाहन अंमळनेर पोलीसां (Police) समोर आहे.

पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे एका अज्ञात व्यक्तीचा खुन (Murder) करून त्याचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून केमिकल टाकुन विद्रूप करण्यात आला होता. ३० डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत सदरील मयताची ओळख पटवण्यासाठी संशयित दिलीप साबळे यांच्या कुटुंबाला पाचारण करण्यात आले होते. परंतु कुटुंबात मयताच्या ओळखीवरुन मतभेदांमुळे ओळख पटवने अशक्य झाले. आईच्या मतानुसार मुलगा होता, परंतु त्याच्या दातात तार असल्याचे सांगण्यात आल्यामुळे दिलीप साबळेच्या दातात तार नव्हती त्यामुळे ओळख प्रलंबीत राहीली होती. अखेर सकाळी मयताच्या हाताच्या अंगठ्याचे चमडे काढुन आधार कार्ड केंद्रावर त्याची तपासणी केली असता सदरील ठसा तंतोतंत जुळल्याने सदरील मृतदेह दिलीप साबळे यांचाच असल्याने स्पष्ट झाले. मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना (Police) तब्बल १९ तास कसरत करावी लागली. आता पोलिसापूढे नेमका खुन (Murder) कशामुळे झाला असावा यासाठी पोलीस यंत्रणा तपास करीत आहे.

Exit mobile version