BEED24

सिरसाळ्यात दोन बालिकांवर अत्याचार…. परळी तालुका पुन्हा चर्चेत

परळीः दि.१६(प्रतिनिधी) सतत या ना त्या कारणाने चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात पुन्हा माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून एका नराधमाकडून ७ व ८ वर्ष वयाच्या दोन बालिकांवर अत्याचार झाल्याची घटना सिरसाळ्यात घडली आहे. याबाबत पिडीत कुटूंबियांनी २४ वर्षीय नराधमा विरोधात सिरसाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद झाला असून आरोपी विरुध्द संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आरोपी हा पिडीत बालिकांच्या घरा शेजारी राहतो. दि.१४ रविवारी पिडीतांच्या आईने मुलींना शेजारी ताक आणण्यासाठी जाण्यास सांगितले. मात्र मुलींनी तिथं जाण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबत मुलींकडे कारण विचारले असता मुलींनी रडत त्यांच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. पिडीत मुलींनी सांगितल्याप्रमाणे आरोपी पिडीत ७ व ८ वर्षाच्या मुलींसोबत घरात कुणी नसल्याचा फायदा घेत मागील पंधरा दिवसांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याचे स्पष्ट झाले. सदरील प्रकार ऐकून पिडीत कुटूंबियांना मोठा धक्का बसला. सदरील प्रकार ऐकताच पिडीत कुटूंबियांनी थेट सिरसाळा पोलिस ठाणे गाठत माहिती दिली. याप्रकाराची पोलिसांनी कसुन चौकशी केली असता प्रकरणाची सत्यता समोर आली. पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचे गांभिर्य ओळखून आरोपी विरुध्द कलम ३५४(अ), ३७६(अ.ब), ५०६ भादविसह ४,८, १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायदा २०१२ नुसार गुन्हा नोंद केला. या प्रकारामुळे सिरसाळ्यातच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

Exit mobile version