BEED24

धारूरच्या घाटात मारहाण करुन लूटले; नित्रुड येथे हातबाय बांधून चालकाला फेकले.

किल्लेधारूर दि.6 फेब्रुवारी – भाड्याने गाडी ठरवून बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kaij) येथून जात असताना एका कार चालकास धारुर घाटात सव्वापाच लाखांना लुटल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत धारुर पोलिसांत (Police) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(Beaten and plundered in the ghats of Dharur; He tied his hands and threw the driver at Nitrud.)

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार केज जि.बीडला जाण्याच्या बहाण्याने पवार नामक व्यक्तीसह चौघांनी शुक्रवारी (दि.4) सायंकाळी नानासाहेब महारूद्र तुपसौंदर (रा .एकता नगर, पाथरी, जि. परभणी) याची कार (एमएच 22 यू 7944) पाथरी येथून भाड्याने ठरवली.

रात्री 9.30 च्या सुमारास ते धारुरच्या घाटात (Dharur Ghat) आले असता त्यांनी लघुशंकेच्या बहाण्याने कार थांबवली. त्यानंतर नानासाहेबला रस्त्याच्या खाली घेऊन बेदम मारहाण केली आणि बळजबरीने कारच्या मागील सीटवर बसवले. त्याचे कपडे काढून तारेने हातपाय बांधले आणि एटीएम कार्ड, रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला. तसेच, जीवे मारण्याची धमकी देत एटीएम आणि गुगल पेचा पासवर्ड विचारून घेतला.

त्यानंतर नानासाहेबला नित्रूड येथील ढाब्याच्या पाठीमागे हातपाय बांधलेल्या अवस्थेत फेकून दिले आणि त्याची कार, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 5 लाख 16 हजार 300 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. याप्रकरणी त्या चार चोरट्यांवर धारूर (Dharur) पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) नोंदवण्यात आला आहे.

 

Exit mobile version