BEED24

बीड जिल्हा दिड हजार पार; धारुर 86, केज 198 … पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.30 एप्रिल- बीड (Beed) जिल्ह्यातील 4717 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1520 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3197 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, राज्यात काल दिलासा मिळाला असून नवीन बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त दिसुन आली.

(Beed district one and a half thousand crosses; Dharur 86, Kaij 198 … see taluka wise statistics.)

आज पंचेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 298 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 236, आष्टी तालुक्यात 187 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 86 तर केजमध्ये 198 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-298, अंबाजोगाई-236, आष्टी-187, धारुर-86, गेवराई-155, केज-198, माजलगाव-65, परळी-116, पाटोदा-65, शिरुर-80, वडवणी-34 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) च्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक अख्ख्या देशभर वाढलेला आहे. राज्यापाठोपाठ बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हजाराच्या आत असणारी आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून हजाराचा टप्पा पार ओलांडत आहे. सध्याची राज्याची परिस्थिती पाहता राज्य शासन लॉकडाऊन वाढविण्यात आला  आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या चोवीस तासांत 66,159 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असली तरी दुसरीकडे 68,537 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 37,99,266 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 6,70,301 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 83.69 टक्क्यांवर आला आहे.

Exit mobile version