औरंगाबाद: दि.२८- बीड (Beed) जिल्ह्यातील तरुणाने औरंगाबाद (Aurangabad) येथे एका तरुणीला नोकरीचे आमिष देवुन अत्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून सदरील तरुणावर सिडको पोलिस (Police) ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बायजीपुऱ्यातील २९ वर्षीय पीडितेचे बीए-डीएडपर्यंत शिक्षण झालेले आहे. सदरील तरुणी घरीच शिकवणी घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. शिकवणीसाठी ती नवीन जागेच्या शोधात होती. बीड बायपास परिसरात दोन महिन्यांपूर्वी भाड्याने खोली शोधत असताना मेहबूब इब्राहिम शेख रा.शिरुर कासार, जि.बीड (Beed) याच्याशी तिची ओळख झाली. त्याने तिला शैक्षणिक माहिती विचारत शिकवणीपेक्षा मुंबईत (Mumbai) नोकरी मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर तो दोन ते तीन वेळा तिला भेटला. १० नोव्हेंबरला त्यांची फ्लॅटवर भेट झाली. तेव्हा मुंबईला (Mumbai) नोकरीच्या शोधात जायचे ठरले. १४ नोव्हेंबरला रात्री नऊला रामगिरी हॉटेलसमोर त्यांची ठरल्यानुसार भेट झाली. त्यानंतर एका कारने महेबूब इब्राहिम शेख तेथे एकटाच आला. सुरुवातीला त्याने तिचा विश्वास संपादन करीत कारमध्ये बसवून गप्पा मारल्या. नंतर त्याने कार जालना रस्त्याजवळील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर अंधारात नेली. तेथे तरुणीवर अत्याचार (Rape) केला. अत्याचाराच्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली आणि कारमधून त्याने उतरवून दिल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. घडलेल्या प्रकारानंतर भेदरलेली तरुणी घरीच होती. तिने हा प्रकार मावशीला सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी सिडको पोलिस (Police) ठाण्यात शनिवार दि.२६ रोजी अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद केली.