मुंबई दि.4 मे – Best headphones हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहण्यावर बंदीचा नियम महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. मुंबई बेस्टने हा नियम केला असून बसमध्ये हेडफोनशिवाय मोबाईलवर व्हिडिओ पाहताना किंवा गाणी ऐकताना आढळून आल्यास तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.
( Best headphones … Ban on watching videos without headphones; New rules implemented in Maharashtra. )
आजकाल Mobile प्रत्येकाच्या हातात आला असून याचा वापर करताना अनेकांचे भान हरवल्याचे बऱ्याच वेळा दिसून येते. अनेक जण सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात व्हिडिओ पाहतात किंवा गाणी ऐकतात. याचा त्रास शेजारच्या लोकांना होतो. यावरुन अनेक वादविवाद होत आहेत. सहसा बस किंवा रेल्वेत अशा घटना वाढत आहेत. यामुळे मोबाईल वापरावर बेस्ट अर्थात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने हा नवीन नियम लागू केला आहे. या नियमांतर्गत बसमध्ये हेडफोनशिवाय Best headphones व्हिडिओ पाहण्यावर बंदी घालण्यात आली असून, नियम मोडल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. बेस्टने या आठवड्यापासून mobile मोबाईलच्या स्पीकरवर व्हिडिओ पाहण्यास किंवा गाणी वाजविण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भातील अधिसूचना 25 एप्रिल रोजी जारी करण्यात आली. नव्या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी बसेसमध्ये सूचना चिकटविण्याचे काम सुरू झाले आहे. हा नवा नियम मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील बस प्रवाशांना लागू होणार आहे.
का आणण्यात आला नवीन नियम ?
मोबाइल वापराबाबत नवा नियम आणण्यामागचे प्रमुख कारण आहे ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषणापासून बस मधील प्रवाशांना गैरसोयीपासून वाचण्यासाठी हा नवीन नियम आणण्यात आला आहे. नव्या परिपत्रकानुसार आवाजाची डेसिबल पातळी कमी ठेवण्यासाठी या नव्या नियमाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच या नियमानुसार कोणत्याही बस प्रवाशाला मोबाईल फोनवर मोठ्याने बोलू दिले जाणार नाही. प्रवाशाला संगीत ऐकायचे किंवा व्हिडिओ बघायचे असल्यास, हेडफोनचा Best headphones वापर करावा लागणार आहे.