BEED24

शिरुर खून प्रकरणातील मुख्य आरोपी भैय्या गायकवाडच्या मुसक्या आवळल्या.

शिरूर कासार दि.1 जून – येथील सराफा व्यावसायिक विशाल कुलथे यांच्या खून (Murder) प्रकरणातील मुख्य आरोपी भैय्या गायकवाड याच्या आज मंगळवार दि.1 पहाटे नाशिक (Nasik) येथून मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी केली.

(Bhaiya Gaikwad, the main accused in the Shirur murder case, smiled.)

शिरूर येथील विशाल कुलथे या सराफा व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याचा खून (Murder) केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मास्टर माईंड ज्ञानेश्वर गायकवाड आणि त्याचे साथीदार धीरज मानकर व केतन लोमटे यांची नावे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

त्यांना न्यायालयाने 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तर यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर (भैय्या) गायकवाड पोलीस (Police) शोध घेत होती. अखेर मंगळवारी पहाटे नाशिक येथून त्यास ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी,अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत व त्यांच्या टीमने त्यांनी केली.

काय आहे घटना…
शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (21) याचे शिरूर कासार येथे सलूनच्या दुकानात सोनाराचा खून (Murder) करण्यात आला होता. याप्रकरणी त्याचा साथीदार केतन लोमटे याला पोलिसांनी ताब्यात घेत तपास केला. लोमटे यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलीस (Police) खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली देत ज्या ठिकाणी मृत्यूदेह पुरण्यात आला ते ठिकाण दाखविले.

शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथील गट नंबर 429/1/1 मधील दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात मृत्यूदेह खड्डा खोदून पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचा शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असल्याने त्याने सोने खरेदीचा बहाना करून सोनार बळी विशाल कुलथे यांच्याशी संपर्क केला.

माझे लाँकडाऊनमध्ये लग्न झाले. त्यामुळे जास्त सोन करायचे आहे, असे सांगून त्याने आॅर्डर दिली होती. दुकानातील तयार असलेले सोने घेऊन माझ्या दुकानात ये असे गायकवाड म्हणाला. सोनारानी सोने घेऊन सलून दुकानात गेला. त्याच ठिकाणी त्याचा घात झाला होता. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर मुख्य आरोपी फरार होता. त्यास आज पहाटे नाशिक (Nasik) येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

Exit mobile version