मुंबई दि.30 नोव्हेंबर – महाराष्ट्रातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी महाराष्ट्रात मुंबईसह, पुणे, नाशिक, नागपुर व औरंगाबाद येथे मात्र शाळा 10 व 15 डिसेंबरनंतर प्राथमिक शाळा सुरू होणार असल्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
(Big decision of local administration; The school will start from 15th December.)
मुंबई
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबईतील शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मुंबई महापालिकेने ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेने शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुंबई (Mumbai) महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्या प्रस्तावावर चर्चा झाली आणि त्यानंतर मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या उद्यापासून सुरू न करता 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक
नाशिक पालिका 10 डिसेंबरला निर्णय घेणार
मुंबई महापालिकेप्रमाणेच इतर शहरात देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. नाशिक (Nashik) पालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. नाशिक पालिका या संदर्भात 10 डिसेंबरला निर्णय घेणार आहे.
शाळा (school) सुरू करण्यासंदर्भातील आदेश शासनाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने (Department of Education) मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षकांचे लसीकरण (Vacccination) 100 टक्के पूर्ण झालेले असावे, तसेच नाशिकमधील ज्या गावात शाळात शाळा सुरू होते, तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव किती आहे, याची माहिती घेतल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येईल, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
पुणे
पुण्यातील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी असे सांगितले की, राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. पुण्यातील शाळांनी पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण केली असली तरी, दुसरीकडे शाळा सुरु करावी, अशी पालकांची भूमिका आहे. मात्र पुणे (Pune) महापालिकेने शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर
नागपुरातील (Nagpur) महापालिका हद्दीतील प्राथमिक शाळा 10 डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाही. त्यानंतरची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट (New variant) ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी आदेश काढले आहेत.
औरंगाबाद
औरंगाबाद (Aurangabad) शहरातील पहिली ते पाचवीच्या शाळा 10 डिसेंबरनंतर सुरु होतील असा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन (omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात थैमान माजवलं आहे. औरंगाबाद महापालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा येत्या 10 डिसेंबरपर्यंत बंदच राहतील. 10 तारखेनंतर शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.