दिल्ली दि. 22 जून – राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही ठळक राजकीय घडामोडी होत आहेत. यातूनच आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची आज विरोधी पक्षातील नेत्यांसोबत महत्वूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉफ्रेंस आणि एनसीपी व्यतिरिक्त काही पक्षांची नेतेमंडळी उपस्थितीत राहणार आहेत. याबैठकीत आगामी लोकसभा निवडणूकी बाबत (Mission 2024) रणनिती ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौथ्यांदा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न ‘राष्ट्रमंच’च्या रुपाने समोर येण्याची जोरदार चर्चा राजकीय गोटातून व्यक्त होत आहे.
(Big news … big political announcement today; Speed up …)
‘राष्ट्रमंच’ या संघटनेची यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी स्थापन केलेली आहे. या संघटनेची बैठक सर्व विरोधीपक्षाच्या नेंत्यासह पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीत शरद पवार यांच्याद्वारे सर्व विरोधी पक्षांना एकजूट करण्याचा दिशेने होत असलेले प्रयत्न खुप महत्वपूर्ण मानले जात आहेत. निवडणूकीचे रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची सोमवारी शरद पवार यांच्यासोबत भेट झाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.
बैठकीत कोण राहणार उपस्थित.
महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी असे म्हटले की, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणाऱ्या बैठकीला फारुक अब्दुल्ला, यशवंत सिन्हा, पवन वर्मा, संजय सिंह, डी राजा, न्यायाधीश एपी सिंह, जावेद अख्तर, केटीएस तुलसी, करण थापर आशुतोष, वकील मजीद मेमन, खासदार वंदना चव्हाण, माजी निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरैशी, केसी सिंह, संजय झा, सुधींद्र कुलकर्णी, कॉलिन गोंलाल्वेस, अर्थशास्री अरुण कुमार, घनश्याम तिवारी आणि प्रतिश नंदी यांच्यासह काही प्रमुख राजकीय नेते आणि प्रतिष्ठीत लोकांची उपस्थितीत असणार आहे. नवाब मलिक यांनी पुढे असे म्हटले की, या बैठकीत आगामी लोकसभा सत्र आणि देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.
दरम्यान, रजकिय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी सोमवारी दिल्लीत शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या महिन्याच्या सुरुवातीला प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा भेट झाली होती. विरोधी पक्षासोबत बैठक करण्यापूर्वी शरद पवार दिल्लीत एनसीपीच्या (NCP) राष्ट्रीय कार्यसमिती सोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत विविध अजेंडावर चर्चा केली जाणार आहे.
तिसऱ्या आघाडीची चर्चा.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Mission 2024) भाजपला धूळ चारण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पवार त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 15 पक्षांच्या नेत्यांसमवेत आज दुपारी 4 वाजता एक बैठक घेणार आहेत.
शरद पवार व प्रशांत किशोर या दोघांची दहा दिवसांपूर्वीच भेट झाली होती. दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी सोमवारी झालेल्या भेटीत त्यांच्याशी प्रशांत किशोर यांनी सुमारे दोन तास चर्चा केली. 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत मोदी सरकारला शह देण्यासाठी प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याचा विचार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी व्यक्त केला होता. त्याची जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना जो विजय मिळाला त्यामागे प्रशांत किशोर यांचीच रणनीती होती.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यसमितीचीही बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक आज दिल्लीत होणार असून, त्यानंतर इतर पक्षांच्या नेत्यांशी शरद पवार चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले की, संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार आहेत. त्या बैठकीत देशाची विद्यमान राजकीय स्थिती, लोकसभेचे आगामी अधिवेशन यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.