BEED24

मोठी बातमी… भारतात ओमिक्रॉनची इंट्री; या राज्यात आढळले दोन रुग्ण.

नवी दिल्ली दि.2 डिसेंबर – 29 देशात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आली असून WHO नंतर ICMR ने व्यक्त केलेले भाकित खरे ठरले आहे. भारतात कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचे (Omicron) दोन रुग्ण सापडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली असून लोकांनी घाबरुन न जात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

(Big news … Omicron’s entry into India; Two patients found in this state.)

बुधवारी रात्री उशिरा या रुग्णांचा अहवाल मिळाला. मागील 24 तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरीएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरीएंटनं (New Variant) धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा (Delta Variant) कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेली आहे.

दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु
कर्नाटकात (Karnataka) सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा 20 नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा 66 वर्षाचा आहे तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढं आहेत.

या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापैकी एकाचं वय 66 असून दुसरा व्यक्ती 46 वर्षाचा आहे.

जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव
गेल्या एक महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळमध्येच (Kerala) 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. देशातील इतर रुग्णांच्या संख्येने हा आकडा 55 टक्के इतका आहे. 49 टक्के लोकांना कोरोनाचे डोस (Corona vaccine) दिल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्या कमी झाल्याचं दिसून आल्याचं केंद्राचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. तसेच जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कर्नाटक-महाराष्ट्राचं आफ्रिका कनेक्शन
महाराष्ट्रात आफ्रिकेतून आलेले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉननं हाहाकार माजवलाय. तिथं दिवसाला कमीत कमी 4 हजार रुग्ण सापडत आहेत. सध्या तिथली रुग्णांची संख्या 10 हजाराच्या वर गेलेली आहे.

दक्षिण आफ्रिकेतल्या बहुतांश प्रांतात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात आफ्रिकेतून आलेल्या आणि येणाऱ्यांवर प्रशासनाचे लक्ष आहे. फक्त दक्षिण आफ्रिकाच नाही तर इतर आफ्रिकन देशातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढतायत. त्यात मोझंबिक, बोत्सवाना, झिम्बाब्वे अशा देशांचा समावेश आहे.

 

Exit mobile version