BEED24

महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूची परभणीतून इंट्री…..

परभणीः दि.११(प्रतिनिधी) देशातील सात राज्यानंतर आता महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचे (Bird flu) आगमन परभणीतून (Parbhani) झाल्याचे निष्पन्न झाले असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

परभणी (Parbhani) येथील मुरुंबा येथे ८०० कोंबड्या दगावल्याची घटना घडली होती. या मृत कोंबड्याचे नमुने प्रशासनाने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवली होती. या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून सदरील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर जिल्हाधिकारी डि.एम. मुगळीकर यांनी मुरुंबा गाव बर्ड फ्ल्यू संसर्गित जाहिर करत उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. मराठवाड्यात बीड, लातूर येथील अहवाल अद्याप आलेली नाहीत. मात्र बर्ड फ्ल्यूचे (Bird flu) आगमन राज्यात झाल्याने प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा चिकन व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत.

Exit mobile version