हैद्राबादः दि.४- एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदोद्दीन ओवेसीच्या नावाने ओळखले जाणाऱ्या हैद्राबाद (Hyderabad) मध्ये महानगर निवडणूकीत भाजपाने (BJP) मोठा विजय मिळवत आहे. गतपंचवार्षिक निवडणूकीत भाजपा केवळ चार जागेवर विजय मिळवू शकला होता आजच्या निकालात मात्र भाजप (BJP) ४८ जागावर बाजी मारत असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांवर तेलंगणा विधानसभा निवडणूक येवून ठेपली असल्याने हैद्राबाद (Hyderabad) महापालिका निवडणूकीचा निकाल महत्वाचा मानला जात आहे. गतपंचवार्षिक मध्ये नगन्य असणाऱ्या भाजपाने (BJP) या निवडणूकीत शानदार प्रदर्शन केले आहे. एकुण १५० जागा असलेल्या हैद्राबाद (Hyderabad) महापालिकेत भाजपाचा (BJP) सर्वाधिक फटका टिआरएस (TRS) ला बसला आहे. टिआरएस (TRS) ९९ वरुन ५७ वर ओवेसीची एआयएमआयएम (AIMIM) पार्टी ४४ वरुन ४२ वर तर काँग्रेस २ जागेवर कायम आहे. निकालात सर्वाधिक ५७ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून टिआरएस पुढे आहे. अद्याप अंतिम निकाल येणे असून मतमोजनी सुरुच आहे.