मुंबई दि.1 जानेवारी – नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या (BJP Leader) पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटची लागण झाली आहे. याआधी पंकजा मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती.
(BJP leader Pankaja Munde infected with omecron; Corona disrupted 10 ministers and 20 MLAs in the state.)
गतवर्षी 2019 मध्ये मार्च महिन्याअखेरीस पंकजा मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. त्यांना सौम्य लक्षणं आहेत.
त्या घरीच उपचार घेत आहेत. पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमान यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नसोहळ्याला पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हजेरी लावली होती. तेथून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
त्यामुळे लोकांनी कोरोना निर्बंधांचे (restrictions) पालन करावे आणि मास्कचा वापर करावा असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. त्याचबरोबर राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर तर निर्बंध वाढवावे लागतील, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे. दररोज रुग्णांची संख्या किती वाढते आहे, ते पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.