BEED24

नगर पंचायतीसाठी भाजपने आखली अशी रणनिती….

बीडः दि.२७ (प्रतिनीधी)- बीड (Beed) जिल्ह्यातील पाच नगरपंचायती साठी येत्या दोन महिन्यात निवडणुका (Election) होणे अपेक्षित असून त्यासाठीची मोर्चेबांधणी भाजपने (BJP) सुरू केली आहे.  प्रत्येक नगरपंचायत साठी स्वतंत्र  प्रभारी च्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.

जानेवारी २०२१ दरम्यान बीड (Beed) जिल्ह्यातील साधारण पाच नगरपंचायतीच्या निवडणूका (Election) घोषित होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या (BJP) सूचनेवरून या निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि खा. डॉ. प्रीतम मुंडे करणार आहेत. याची पुर्वतयारी म्हणून प्रत्येक नगर पंचायत साठी प्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदरील प्रभारी, जिल्हाध्यक्ष आणि इतरांच्या चर्चेनंतरच माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायती साठी च्या उमेदवारांच्या अंतिम याद्या केल्या जाणार आहेत. वडवणी- आ. लक्ष्मण पवार, केज- राजेंद्र मस्के, पाटोदा- डॉ. स्वरुपसिंह हजारी, आष्टी -सर्जेराव तांदळे तर शिरूर – राजाभाऊ मुंडे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version